सावंतवाडी,दि.२७ जुलै
सातार्डा येथील तरुण भाविक जम्मू काश्मीर याठिकाणच्या पवित्र अमरनाथ यात्रेसाठी रविवारी सकाळी रवाना झाले.माता वैष्णव देवी,वायेगुरु सुवर्ण मंदिराचे दर्शन घेणार आहेत.
बारा दिवसांच्या देवदर्शनासाठी येथील तरुण अक्षय पेडणेकर, रुपेश मांजरेकर, यतीन घाडी, प्रदीप धूपकर यांनी रविवारी सकाळी ग्रामदैवत श्री रवळनाथ देवाचे दर्शन घेऊन अमरनाथ यात्रेला रवाना झाले आहेत.
भक्तीभावाने सातार्डा गावातील तरुण भाविक पहलगाम मार्गे पवित्र अमरनाथ गुहेचे दर्शन घेणार आहेत.बेचाळीस किलोमीटर पदयात्रेने चार हजार मीटर उंचावर असलेल्या अमरनाथ गुहेचे दर्शन घेणार आहेत.ग्रामस्थांकडून तरुणांना अमरनाथ यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
माता वैष्णवदेवी, अमृतसर येथील वायेगुरु सुवर्ण मंदिराचे दर्शन घेऊन सातार्डा गावातील तरुण भाविक गावी परतणार आहेत.