सावंतवाडी,दि.२७ जुलै
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले त्याच्यावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने जुने शिवसैनिक तसेच सामाजिक राजकीय व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.वाडकर हे एक निष्ठावान शिवसैनिक असल्याने त्याना शिवसेनेच्या वतीने भगवी शाल अर्पण करण्यात आली यावेळी अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
उत्तम वाडकर हे गेल्या काहि दिवसापासून आजारी होते.कोल्हापूर येथे त्याच्यावर उपचार सुरू होते.त्यातच त्याचे रविवारी निधन झाले.वाडकर याच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरताच वाडकर यांच्या काळातील अनेक शिवसैनिक सावंतवाडीत आले होते. त्यानी वाडकर यांना श्रध्दांजली अर्पण करून संदिप टोपले सह अन्य शिवसैनिकांनी भगवी शाल त्याच्या पार्थिव देहावर अर्पण करण्यात आली.उत्तम वाडकर हे सावंतवाडी दोडामार्ग अखंड तालुक्याचे तालुकाप्रमुख होते.त्यावेळी त्यांनी जोरदार संघटना वाढवली होती.त्यामुळे बहुतांशी शिवसैनिक आज आले होते. त्यांनी वाडकर यांना श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी उपनगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर जिल्हाप्रमुख संजू परब अॅड.बापू गव्हाणकर आनंद नेवगी उध्दव सेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ भाई देऊलकर, विनोद काजरेकर चंद्रकांत कासार आबा केरकर विलास सावंत सुधीर पराडकर अशोक धुरी संदिप राणे आजो मांजरेकर संतोष गावस सुरेश भोगटे दत्ताराम गावकर पत्रकार अभिमन्यू लोंढे हरिश्चंद्र पवार अनंत जाधव साप्ताहिक संघटनेचे अध्यक्ष नितीन तळेकर दिव्या वायंगणकर संजीवनी देसाई दिलीप हिदळेकर मनोज माळकर हर्षवर्धन धारणकर अॅड सुनिल लोढ आदि उपस्थित होते.