​सावंतवाडी : गुरुपौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत श्री साई पालखी पूजन सोहळ्याचे आयोजन

शेअर करा

आमदार दीपक केसरकर यांचे कार्यकर्त्यांना व साईभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन

​सावंतवाडी,दि.२७ जुलै
सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता श्री साई पालखीचे आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ या निवासस्थानी आगमन होणार आहे.
​याप्रसंगी आमदार दीपक केसरकर आणि सौ. पल्लवी केसरकर यांच्या हस्ते श्री साई पालखीचे पूजन पार पडणार आहे. या पूजन सोहळ्यास सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे निमंत्रण आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे.
​तसेच, बुधवार, २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता श्री साई पालखी माडखोल येथे रवाना होणार आहे. या संपूर्ण पालखी सोहळ्यास व दर्शनासाठी सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा