१७४ वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या ग्रंथालयात वर्षभर विविध उपक्रम; २८ जून रोजी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन.
सावंतवाडी दि.२७ जून
१८ एप्रिल १८५२ रोजी स्थापन झालेले श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी हे ग्रंथालय संपूर्ण सावंतवाडी शहरासाठी भुषणावह आहे. अनेक अडचणींवर मात करून गेली १७४ वर्ष अविरतपणे कार्यरत आहे. चालू वर्ष हे ग्रंथालयाचे शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष असल्याने याचेच औचित्य साधून संस्थेने या पुर्ण वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. यामध्ये आपला सहभाग असावा याकरिता रविवार दिनांक २८ जुन २०२६ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडीच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले आहे, तरी आपण उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे