सावंतवाडी : सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल व सेंट्रल उर्दू हायस्कूल सावंतवाडी प्रशालांच्या एस् . एस् . सी . विद्यार्थ्यांचा गुणगौरव

शेअर करा

सावंतवाडी दि.२ जून
सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल व सेंट्रल उर्दू हायस्कूल सावंतवाडी प्रशालेतील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ एस् . एस् . सी परिक्षेत प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत प्रशालेच्या १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली . सेंट्रल इंग्लिश स्कूलमधील
प्रथम क्रमांक: कुमारी फिदा जहिरअब्बास शेख 91 . 40 %
द्वितीय क्रमांक: कुमार मोहम्मद साहिल इकबाल नाईक 87.60 %
तृतीय क्रमांक : कुमारी मिस्बा
जमीरूद्दीन शहा 87.40%
व कुमार फुदैल हसन आगा याने
87. 20 % गुण मिळवून चौथा
क्रमांक आणि कुमार मोहम्मद झैद हानिफ मेमन याने 86 .60% गुण मिळवून पाचवा क्रमांक प्राप्त केला .तसेच परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या एकुण २० विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी विशेष प्राविण्य आणि ४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
तसेच सेंट्रल उर्दू हायस्कूल सावंतवाडी मधील कु . आयेशा सावकार हिने
85 .80% गुण मिळवून प्रथम , कु . अबुझर मलिकजान धामणेकर व कु . खदिजा अली अकबर बक्कर यांनी
78 .80% गुण मिळवून द्वितीय व कु . इशरत मालदार 73 . 80 % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला .
या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा मंगळवार
दि. २ -०६ – २०२६ रोजी प्रशालेत संपन्न झाला . या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य व माजी मुख्याध्यापक श्री . भरत गावडे , सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष श्री . इम्तियाज खानापूरी , उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग , सचिव श्री . परवेज बेग , विश्वस्थ श्रीम . अलिझा खान , श्रीम. फरहिन खान ,श्री. सोहराब बेग, श्री . अब्दुलरहीम बागवान , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला
हेशागोळ , सेंट्रल उर्दू स्कूलच्या शालेय समितीचे सदस्य श्री . इशान खानापुरी , सेंट्रल उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री . इकबाल मुलानी , केजी विभागाच्या इन्चार्ज श्रीम. फरीदा बागवान , पालक प्रतिनिधी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , सेंट्रल इंग्लिश स्कूल व सेंट्रल उर्दू हायस्कूलचे गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते .प्रशालेच्या मुख्याधापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनी पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .
सहाय्यक शिक्षिका श्रीम. मारिया पिंटो यांनी विद्यार्थ्यांच्या निकालाचे वाचन केले. सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रक व पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सेंट्रल इंग्लिश स्कूल मधील अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी कु . फिदा शेख, कु . मोहम्मद साहिल नाईक , कु . मिस्बा शहा तसेच सेंट्रल उर्दू हायस्कूल मधील कु . आयेशा सावकार , कु . अबूझर धामणेकर , कु . खदिजा बक्कर , कु . इशरत मालदार यांना पुष्पगुच्छ व धनादेश देऊन प्रशालेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . पालकांनी आपल्या मनोगतातून प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . सहाय्यक शिक्षिका श्रीम. स्मृती गवस यांनी पालक व शिक्षक या दोन्ही भूमिकेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
प्रमुख पाहुणे श्री . भरत गावडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मुख्याध्यापिका करणाऱ्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिका यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . सर्व विदयार्थ्यांनी निर्णयक्षम बना व संयम बाळगा ,असे मौलिक विचार स श्री .इकबाल मुलानी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले . आई – वडिलांचा सन्मान करा , असा मोलाचा उपदेश श्रीम . निलोफर बेग यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला . कार्यक्रमाच्या शेवटी
शिक्षिका श्रीम. स्मृती गवस यांनी आभार व्यक्त केले . उपस्थित सर्वांनीच प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

शेअर करा