सावंतवाडी,दि.२७ जुलै
सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेला या आर्थिक वर्षात २ कोटी ८७ लाख रुपयांचा नफा झाला आहे. तर संस्थेने यावर्षी १२५ कोटी ५१ लाख रुपये ठेविंचा टप्पा गाठला आहे. संस्थेची या वर्षातील आर्थिक लढा उलाढल २१३ कोटी रुपये असून सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. संस्थेने यावर्षीही आपला ऑडिट वर्ग अ कायम राखला आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष कृष्णा उर्फ प्रकाश आडणेकर यांनी सिंधुदुर्ग येथे केले. आज रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ३९ वी वार्षिक सभा संस्थेच्या पी.एफ. सभागृहात संपन्न झाली यावेळी अध्यक्ष श्री. आडणेकर बोलत होते.
सभेच्या सुरूवातीला जिल्हा सहकार मंडळाचे विकास अधिकारी श्री. पांचाळ तसेच तात्यासाहेब मोहिते, सहकार प्रशिक्षण केंद्राचे माजी प्राचार्य श्री. कुंभार यांनी उपस्थित सर्व सभासदांना सहकार कायद्याबाबत तसेच सभासद हक्क याबाबत माहिती व सहकार प्रशिक्षण दिले.
यावेळी उपाध्यक्ष श्री. देविदास आडारकर, संचालक श्री. दिनेश खवळे, श्री. राजन साळूंखे, श्री. वासुदेव वरवडेकर, श्रीम. अनघा तळावडेकर, श्रीम. वर्षा मोहिते, श्री. राजेश चव्हाण, श्री. प्रविण सावंत, श्री. राजेंद्र शिंगाडे, श्री. चेतन गोसावी, श्री. विलास चव्हाण, श्री. बाळकृष्ण रणसिंग, श्री. अमित गंगावणे, तसेच संस्थेचे तज्ञ संचालक श्री. भाग्यवंत वाडीकर उपस्थित होते.
सुरुवातीला संस्थेच्या निधन झालेले सभासद, सहकार क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, देशबांधव तसेच कारगील युद्धात शहिद जवान श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इ. १० वी, इ. १२ वी तसेच इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
वार्षिक अधिमंडळ सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन सचिव श्री. निलेश ज. कुडाळकर यांनी केले. तर सूत्रसंचालन संचालक श्री. दिनेश खवळे यांनी केले. त्यानंत अहवाल वाचन, आर्थिक पत्रकांना मंजूरी, नफा विभागणी मंजूरी, ऑडीट रिपोर्ट वाचन, अंदाजपत्रक मंजूरी, बँक कर्ज उचलीस मंजूरी, वैधानिक लेखा परिक्षकांची नेमणूक, आदर्श उपविधी २०२६ ला मंजुरी व अन्य विषयावर सविस्तर चर्चा होऊन मंजूरी देण्यात आली. यावेळी सभासद श्री. श्रीप्रसाद मराठे, श्री. राजन ठाकूर, श्री. दशरथ गावडे, श्री. सूर्याजी पवार, श्री. चेतन नेरूरकर, श्री. पुंडलिक पार्सेकर श्री. संतोष राणे, श्री. सुनिल राठीवडेकर, श्री. प्रफुल्ल गायकवाड, श्री. मंगेश गावडे, श्री. भालचंद्र दाभोलकर, श्री. दिपक तारी यांनी चर्चेत भाग घेतला.
संस्थेचे संचालक श्री. दिनेश खवळे यांचा सेवानिवृत्तीपर व श्री. अमित गंगावणे यांचा राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण झालेबद्दल अध्यक्षांचा हस्ते संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संचालिका श्रीम. अनघा तळावडेकर यांनी उपस्थित सर्व सभासद, पत्रकार, ठेवीदार, हितचिंतक या सर्वांचे आभार मानले.