सावंतवाडी : कोंडुरे येथे कै. विद्याधर शिरसाट स्मृतिप्रीत्यर्थ १ ऑगस्ट रोजी कथाकथन स्पर्धा

शेअर करा

सावंतवाडी,दि.२५ जुलै

विद्यार्थ्यांमधील वाचन संस्कृती, वक्तृत्व कौशल्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोंडुरे येथील पारिजात मंगल कार्याल येथे कै. विद्याधर शिरसाट स्मृतिप्रीत्यर्थ १ ऑगस्ट रोजी भव्य कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेची वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत राहील.
स्पर्धा दोन गटात घेतली जाणार असून,गट क्र. १ इयत्ता पहिली ते चौथी .कथाकथनासाठी वेळ ५ मिनिटे, गट क्र. २ इयत्ता पाचवी ते सातवी, कथाकथनासाठी वेळ ७ मिनिटे राहील.
उत्कृष्ट स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके, स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार असून
सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धा नोंदणीसाठी
अमोल आरोसकर ९४०४७४८९८० या नंबर वर संपर्क साधावा.

शेअर करा