सावंतवाडी,दि.१५ जुलै
गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान, शिरोडा संचलित
गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
कुमार अथर्व चाळोबा हरगुडे याने राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण गटातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ वा क्रमांक तर वेंगुर्ला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच कुमारी हार्दिका लवू सातार्डेकर हिने वेंगुर्ला तालुक्यात ५ वा क्रमांक मिळवला.
या उज्ज्वल यशाबद्दल दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तसेच गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान, शिरोडा संचलित
गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.