सावंतवाडीत ‘माहिती तंत्रज्ञान आयटी’ प्रशिक्षण कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद; नवउद्योजकांसाठी रोजगाराची मोठी संधी

शेअर करा

सावंतवाडी,दि.०५ ऑगस्ट
जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , सिंधुदुर्ग आयोजित ‘माहिती तंत्रज्ञान (IT)’ प्रशिक्षण कार्यक्रमाला सावंतवाडी येथील गवाणकर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा व भावी नवउद्योजकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आयटी क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेता, हे प्रशिक्षण नवउद्योजक घडवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
​कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी श्री. शिंगटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ या योजनेवर भर देत, तरुणांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
​MCED सिंधुदुर्गचे प्रकल्प अधिकारी श्री. राजेश कांदळगावकर यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कशा प्रकारे उद्योजकतेला चालना देण्यासाठी काम करते, याची सविस्तर माहिती दिली. तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता यशस्वी उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहावे आणि शासकीय योजनांचे योग्य नियोजन करून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
​या कार्यक्रमाला श्री शिंगटे , राजेश कांदळगावकर, रोहित परब तसेच गवाणकर कॉलेजचे प्रा. शैलेश गावडे प्रमुख उपस्थित होते.
​या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन MCED च्या समन्वयक सुषमा साखरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष आभार मानले.

शेअर करा