​सावंतवाडीत २५ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा शांततापूर्ण ‘आंदोलन मार्च’; उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन

शेअर करा

सावंतवाडी दि.२४ जुलै
विद्यार्थ्यांचे हक्क आणि उज्ज्वल भविष्यासाठी सावंतवाडी शहरात २५ जुलै रोजी एका विशेष ‘शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलन मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘विद्यार्थी एकत्र – उज्ज्वल उद्यासाठी’ या ब्रीदवाक्याखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, यात तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
​हा आंदोलन मार्च २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. काळसुलकर इंग्लिश स्कूल ते गांधी चौक असा या मार्चचा मार्ग असणार आहे.


​शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क असून शांतता आणि एकतेच्या मार्गाने सकारात्मक बदल घडवून आणणे हा या मार्चचा मुख्य उद्देश आहे. “हिंसा नको, द्वेष नको, फक्त शांती आणि फक्त बदल” हा संदेश देत विद्यार्थी या आंदोलनात सहभाग नोंदवणार आहेत.
​या मार्चमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकता दाखवून द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा