सावंतवाडी : आमदार ​दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

शेअर करा

सावंतवाडी,दि.२१ जुलै
महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १ सह गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
​या कार्यक्रमास शिवसेना माजी जिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय माजगावकर, ग्रामपंचायत सदस्य बाळा वेजरे, सौ. मधु कुंभार, केंद्रप्रमुख सौ. प्रज्ञा राऊळ, शाळेचे मुख्याध्यापक अनंत बांदेकर, शिक्षिका सौ. शिवप्रिया सावंत, सौ. नाईक, अंगणवाडी ताई, एकनाथ हळदणकर यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा