सावंतवाडी,दि.२२ ऑगस्ट
सावंतवाडी शहरातील मोती तलावात शनिवारी दुपारी आत्महत्येच्या दोन घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे…
आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह सापडला असून, एका युवतीने ही तलावात उडी घेतल्याची माहिती समोर येत आहे. दप्तर, मोबाईल, इयरबड आणि वॉलेट घटनास्थळी सापडले. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असून बघ्याची मोठी गर्दी झाली आहे…
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, युवतीचा शोध घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. घटनास्थळी दप्तर, मोबाईल, इयरबड आणि वॉलेट आढळून आल्याने पोलिसांकडून या साहित्याची तपासणी करून संबंधित व्यक्तीची ओळख व घटने मागील नेमके कारण शोध घेतला जात आहे…
या घटनेची माहिती शहरात मिळताच मोती तलावात परिसरात नागरिकांची आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे…
पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरु करण्यात येत आहे. आत्महत्येच्या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित आहेत का, या बाबत अद्यापतरी अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. पोलिसांच्या तपासा नंतरच या घटनेचे नेमके कारण आणि वस्तुस्थिती समोर येणार आहे…
मोती तलावातील या घटनेने सावंतवाडी शहर हादरले असून, नागरिकां मध्ये ही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे…