सावंतवाडी,दि.१७ जुलै
सावंतवाडी येथील वैश्य समाज आणि हिंदू वैश्यवाणी युवा संघटना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १९ जुलै रोजी गुणवंत विद्यार्थी व ज्ञातीबांधवांचा ‘गुणगौरव सोहळा-२०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात सायंकाळी ५ ते ७ वाजता या वेळेत संपन्न होणार आहे.
या सोहळ्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील वैश्यवाणी ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा तसेच यावर्षी विविध क्षेत्रांत उज्ज्वल कामगिरी केलेल्या ज्ञातीबांधवांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
हा गुणगौरव व कौतुक सोहळा यशस्वी करण्यासाठी हिंदू वैश्यवाणी युवा संघटना सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. अमित गवढंळकर, वैश्य समाज सावंतवाडीचे ज्येष्ठ श्री. रमेश भाट आणि वैश्यवाणी महिला संघटना सावंतवाडीच्या अध्यक्षा सौ. तनुजा पोकळे व सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.
तालुक्यातील सर्व वैश्यवाणी ज्ञातीबांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून या गुणवंत बांधवांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.