सावंतवाडी,दि.२३ जुलै
सावंतवाडी शहरातील वैश्यवाडा येथील रहिवासी तथा ज्येष्ठ हस्तकलाकार आत्माराम उर्फ दया शंकर नार्वेकर (वय ७८) यांचे मंगळवार, दि. २२ जुलै रोजी निधन झाले.
दया नार्वेकर यांनी सावंतवाडीच्या समृद्ध हस्तकला परंपरेत मोलाचे योगदान दिले. सावंतवाडी राजघराण्याच्या हस्तकला विभागात त्यांनी अनेक वर्षे कलाकुसरीचे कलाकार म्हणून कार्य करत आपल्या कौशल्याची वेगळी छाप उमटवली. त्यांच्या हातून साकारलेल्या कलाकृतींमुळे त्यांना परिसरात एक कुशल आणि समर्पित कलाकार म्हणून ओळख मिळाली होती.
त्यांच्या निधनामुळे सावंतवाडीच्या हस्तकला क्षेत्राने एक अनुभवी कलाकार गमावला असून, त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.