विठ्ठल नामाच्या दिंडीत रमले शालेय विद्यार्थीवेंगुर्ला शाळा नं.१ चा उपक्रम

शेअर करा


वेंगुर्ला,दि.२५ जुलै (प्रथमेश गुरव)

आषाढी एकादशी निमित्ताने वेंगुर्ला शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वारकरी वेशभूषेसह शहरात काढलेल्या वारकरी दिंडीने विठ्ठल नामाचा गजर करीत वातावरण भक्तिमय केले. या दिंडीने माणिकचौक विठ्ठल मंदिरात जाऊन तेथे भजन सेवा केली.
आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शाळा नं.१ तर्फे वारकरी दिंडीचे आयोजन केले होते. शाळेमधून प्रारंभ झालेल्या या दिंडीचे रामेश्वर गल्ली, पिराचा दर्गा मार्गे माणिचौक विठ्ठल मंदिरात आगमन झाले. मंदिरातर्फे या दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडीतील सहभागी मुलांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी भजन सेवा करीत विठ्ठलनामाचा जयघोष केला. त्यानंतर दिंडी पुन्हा शाळेमध्ये येऊन या वारकरी दिंडीची सांगता झाली. या दिंडी पारंपरीक वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी, विठ्ठल रखुमाईची वेशभूषा केलेली विद्यार्थी आणि विद्यार्थीनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष सेजल रजपूत, सदस्य संजय पिळणकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शिक्षक प्रशांत मांडे, लीना नाईक, अनुश्री कुशे, वंदना शितोळे यांच्यासह पालक साक्षी वेंगुर्लेकर, विभा पुराणिक, सौ.मेस्त्री, सौ.परब आदी सहभागी झाले होते.

शेअर करा