सिंधुदुर्ग : सव्वा कोटींच्या गोवा दारू प्रकरणाची सखोल चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

शेअर करा

महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; चेकपोस्टवरील निष्काळजीपणाचीही चौकशी करण्याची मागणी

सिंधुदुर्ग,दि.०६ जुलै

ओरोस येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारू जप्तीच्या कारवाईची सखोल चौकशी करून या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकाधिकार समिती अध्यक्ष एडवोकेट प्रसाद करंदीकर यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री होत असल्याचे वेळोवेळी उघड झालेल्या पोलीस कारवायांमधून स्पष्ट होते. मात्र, अशा कारवायांमध्ये केवळ वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होते, तर या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधार आणि विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे.

नुकत्याच झालेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. ही दारू कोणाकडून खरेदी करण्यात आली, संबंधित विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने होते का, तसेच एवढा मोठा दारूचा साठा महाराष्ट्राच्या हद्दीत कसा पोहोचला, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे.

याशिवाय, संबंधित वाहन किंवा यापूर्वी अशाच प्रकरणांत जप्त झालेली वाहने राज्यातील चेकपोस्टमधून कशी मार्गस्थ झाली, त्या वेळी संबंधित तपासणी यंत्रणांनी दुर्लक्ष का केले, तसेच कोणत्या मार्गाने ही वाहतूक झाली, याचीही सखोल चौकशी करून दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रसादजी करंदी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

सव्वा कोटींच्या गोवा दारू प्रकरणाची सखोल चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; चेकपोस्टवरील निष्काळजीपणाचीही चौकशी करण्याची मागणी

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी :