बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ; बॅंकेला १४९. ४३ कोटींची ढोबळ नफा
सिंधुदुर्ग ,दि.०१ जुलै
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ७१ ७६.२१ कोटीएवढा व्यवसाय वाढ ही एकूण निधीमध्ये ११०.६१कोटीची वाढ १४९. ४३ कोटी एवढा ढोबळनफा झाला आहे,बँकेच्या सभासदांना त्यांच्या भाग भांडवलमध्ये १३.५० टक्के व्याज , तसेच कर्मचाऱ्याना २० टक्के बोनस जाहीर केला आहे,जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्याच्या खात्यात २ कोटी २० लाख रक्कम येत्या आठ दिवसांत त्याच्या खात्यातजमा केले जातील, शेतकऱ्याना ५ लाखापर्यंत शेती कर्ज,महिला बचत गटनाही महिला सक्षमीकीकरणासाठी १० लाखा पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली .
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४३ वी वार्षिक सर्व साधारण सभा बुधवार दि.०१ जुलै २०२६ रोजी बँकेच्या वर्धापन दिनी आयोजित करण्यात आलीहोती यावेळी वँकेचे अध्यक्ष मनिष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर, समीर सावंत,विद्याप्रसाद बांदेकर गणपत देसाई, महेश सारंग, प्रज्ञा ढवण, नीता राणे ,गजानन गावडे, विद्या परब आदींसह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई व इतर उपस्थित होते याअनुषंगाने बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी बँकेची आर्थिक स्थिती व एकंदरित कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.
गेल्या चार वर्षांपूर्वी साडेसात हजार कोटी वरून बँक पुढीलआर्थिक 2वर्षात दहा हजार कोटीचा टप्पा पूर्ण करेल, आम्ही ज्या आर्थिक सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये बँकेला रू.६०९.४५ कोटीच्या ठेवी प्राप्त होवून बँकेच्या एकूण ठेवी रू.३९४२.५७ कोटी एवढ्या झालेल्या आहेत. कोकणातील इतर जिल्हा बँकांशी तुलना करता या बँकेचे ठेव वाढीचे प्रमाण १८.२८% एवढे सर्वाधिक आहे. बँकेच्या कर्जव्यवहारामध्ये रू.४७२.०१ कोटीची वाढ होवून एकूण कर्जे रू.३२३३.६४ कोटी एवढी झालेली आहेत. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये बँकेने रू.७०००.०० कोटीचा व्यवसायाचा टप्पा ओलांडलेला असून दि.३१ मार्च २०२६ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय रू.७१७६.२१ कोटी एवढा झालेला आहे. बँकेच्या एकूण निधीमध्ये रू. ११०.६१ कोटीची वाढ होवून एकूण निधी रू.६३३.६४ कोटी एवढे झालेले आहेत. चालू वर्षी बँकेस ढोबळ नफा रू. १४९.४३ कोटी एवढा झालेला असून सर्व आवश्यक तरतूदी केल्यानंतर बँकेचा निव्वळ नफा रू.५०.०० कोटी एवढा आहे. बँकेचे ढोबळ एनपीएचे प्रमाण ३.४५% एवढे असून निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.००% एवढे आहे. बँकेचे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाणामध्ये ०.६३% एवढी वाढ होवून सदर प्रमाण ११.९२% एवढे झाले आहे. बँकेकडून विविध आर्थिक निकषांची पूर्तता नियमितपणे होत असून याही वर्षी बँकेस वैधानिक लेखापरिक्षणामध्ये ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.
जिल्हयातील सर्वसामान्य शेतकरी, छोटे मोठे उद्योजक, ग्रामीण कारागीर, युवक व महिला वर्ग या सर्व घटकांचा विचार करून बँकेकडून उत्तमोत्तम अशी बँकिंग सेवा देणेत येत आहे. जिल्हयातील शेती व शेतीपुरक व्यवसायांना चालना देताना जिल्हा बँकेचा पाया असलेल्या विविध कार्यकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी बँकेने विविध उपक्रम राबविले आहेत. केंद्रशासनाच्या विकास संस्था सक्षमीकरणाच्या प्रकल्पामध्ये बँकेची कामगिरी राज्यभरामध्ये वाखाणली जात आहे. केंद्रशासनाच्या संस्था संगणकीकरण योजनेतून जिल्ह्यातील विकास संस्थांचे १००% संगणकीकरण करण्याचे काम गतीमान करण्यात आले असून त्यासाठी बँकेकडून संगणकीकरणाचे कामकाज पुर्ण करणाऱ्या सचिवांसाठी वैयक्तिक बक्षिस योजना बँकेकडून राबविणेत आली. आधुनिक बँकिंगची गरज ओळखून बँकेने राष्ट्रीयीकृत बँकांच्या समकक्ष ग्राहकांना डिजीटल बँकिंगच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून बँकेचे असंख्य ग्राहक या सुविधांद्वारे बँकेशी जोडले गेले आहेत. जिल्हयातील महिलांचा बँकिंगमध्ये सहभाग वाढावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने बँकेने व्यवसाय वार्ताहर म्हणून सद्यस्थितीत ४४ बँक सखींची नियुक्ती करून त्यांच्याद्वारे जिल्हयातील महिलांना बँकिंग सेवा पुरविण्यात येत आहे. डिजीटल तंत्रज्ञानातून बॅंक देत असलेल्या विविध डिजीटल सेवांच्या विस्तारीकरणाचा भाग म्हणून एईपीएस सुविधा सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. बँकेने मायक्रो एटीएमच्या माध्यमातून ग्रीन चॅनेल काऊंटर बरोबरच वृध्द, अपंग, आजारी व्यक्ती यांना घरपोच बँकिंग सेवा मिळण्याच्या दृष्टीने डोअर स्टेप बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
बँकिंग हा केवळ व्यवसाय न मानता बँक इको फ्रेंडली गणेश मुर्ती, व्यावसायिक प्रशिक्षण, एनजीओमार्फत विकासात्मक कामे, बचत गटांना प्रशिक्षण व मार्केटिंगसाठी सहाय्य, बलसिंधु दत्तक योजनेमार्फत जिल्ह्यातील कुपोषित बालकांना वैद्यकीय सुविधा इत्यादी माध्यमातून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपत आहे.
जिल्हयातील सर्व सभासद सहकारी संस्था, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक या सर्व घटकांच्या सहकार्यामुळे बँक उत्तरोत्तर प्रगती करीत असून येत्या आर्थिक वर्षअखेर बँकेचा एकूण व्यवसाय रू.८५०० कोटी पर्यंत नेण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. जिल्हयातील सहकारी चळवळीचा गुणात्मक विकास होण्याच्या दृष्टीने विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत कर्जव्यवहार वाढविणे, सहकारी संस्थांना सक्षम बनविणेसाठी बँकेकडून प्रयत्न करण्यात येत असून ग्राहकाभिमुख सेवेद्वारे शेतकरी, शेतमजूर, व्यापारीवर्ग, सर्व वयोगटातील ग्राहकवर्ग, नोकरदार, महिलावर्ग, विद्यार्थी यांच्यासाठी उत्तमोत्तम बँकिंग सेवा देणेस बँक कटिबद्ध असल्याचे व यासाठी सर्व घटकांचे सहकार्य यापुढेही बँकेस लाभेल असा विश्वास बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या मागील भरती झालेल्या ७३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती येथे आठ दिवसात देण्यात येणार आहे. नव्याने अजून ६५ कर्मचाऱ्यांची भरती जिल्हा बँक होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कुपोषणाच्या साठी सातत्याने प्रयत्न करून या जिल्ह्यातील कुपोषित बालकांना कुपोषणाच्या वर आणण्याचा सातत्याने केल्या प्रयत्न यशस्वी झाला आहे. जिल्ह्याला कुपोषण मुक्त जिल्हा बनविण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ अधिक सक्षम पणे काम करणार आहोत. नारळ, सुपारी साठी पिक विमा योजना मध्ये समाविष्ट झाला असून शासनाने जाहीर केलेल्या या धोरणानुसार संस्थेची वाटचाल सुरू राहील असे बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले.