कोकण विभागातील आंबा आणि काजू नुकसानी भरपाईपोटी २०९ कोटी १० लक्ष मंजूर; सिंधुदुर्गातील ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांना एकूण ७९ कोटी रुपयांची मिळणार नुकसान भरपाई
सिंधुदुर्ग,दि.२५ जून
कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आज आमदार निलेश राणे सभागृहात सरकारला धारेवर धरत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या त्यावर कृषीमंत्री मामा भरणे यांनी तत्काळ कार्यवाही करू असा शब्द सभागृहात दिला होता. त्यानुसार कार्यवाही करत १२ तासांच्या आत शासन निर्णय जाहीर करत प्रती हेक्टरी २२,५०० प्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे. यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांना एकूण ७९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे, यात कुडाळ तालुक्यातील ७७५१ शेतकऱ्यांना १२ कोटी ५७ लाख तर मालवण तालुक्यातील ७४२९ शेतकऱ्यांना ११ कोटी २२ लक्ष एवढी नुकसानभरपाई मिळणार आहे, असून खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे,आ. निलेश राणे यांचा पाठपुरावा व प्रयत्न यशस्वी ठरले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
मार्च एप्रिल मे २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून ३३४ कोटी ९८ लक्ष रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. त्यात कोकण विभागातील आंबा आणि काजू नुकसानी साठी २०९ कोटी १० लक्ष रुपयांची मदत मंजूर झाली आहे.मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची माहिती मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती दिली आहे.
त्या व्यतिरिक्त विमा कंपन्यांनाकडून नुकसानभरपाई मिळणे बाकी असून आमदार निलेश राणे त्याचा पाठपुरावा करत आहेत.आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर कोकणातील शेतकऱ्यांची समस्या मांडत अवघ्या काही तासात शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यास सरकारला भाग पडणाऱ्या आमदार निलेश राणे यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. २०१३ नंतरची अश्या प्रकारची ही पहिलीच नुकसानभरपाई आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आहे.