गिरिजा राऊत यांच्या राऊत कुटुंबावरील आरोप प्रकरणी १८ जुलै हजर राहण्याचे आदेश
सिंधुदुर्ग,दि.१६ जुलै
माजी खासदार विनायक राऊत आणि मुलगा गीतेश राऊत यांच्याविरुद्ध गिरिजा राऊत यांनी ठाणे कपूरबावडी पोलीस ठाण्यात अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर अनेकांची चौकशी सुरू झाली आहे. याबाबत सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष तथा शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना सदर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास कामाबाबत १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कापूरबावडी पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत समजपत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
विवो: याबाबत ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी संजू परब हे आपल्या पक्षातील अनेक राजकीय नेत्यांना कोलगाव (सावंतवाडी) येथील भोंदूबाबा फिरोजकडे घेऊन गेलेत. त्यामुळे सत्ताधारी संजु परब यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न वैभव नाईक यांनी उपस्थित करीत खरातबाबा हे सावंतवाडीतील कोणत्या आमदारांच्या जवळ होते, हे माहीत आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक आध्यात्मिक गुरु होऊन गेले असताना हे राजकीय नेते निवडणूक जिंकण्यासाठी कुठले तंत्र हे लोक घेतात हा प्रश्न असून त्यामुळे संजु परब यांची चौकशी व्हावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे
