सिंधुदुर्गात पावसाचा जोर कमी..

शेअर करा

वैभववाडीत मात्र दमदार 73 मिमी पावसाची नोंद

सिंधुदुर्ग,दि.२७ जून

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी (27 जून) बहुतांश तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. मात्र वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 73 मिमी दमदार पावसाची नोंद झाल्याने तेथे पावसाने चांगली हजेरी लावली.

आज जिल्ह्यातील सरासरी पावसाची नोंद 15.68 मिमी इतकी झाली.

तालुकानिहाय पावसाची नोंद (मिमी):

देवगड – 00

मालवण – 25

सावंतवाडी – 4.5

वेंगुर्ला – 07

कणकवली – 06

कुडाळ – 06

वैभववाडी – 73

दोडामार्ग – 04

वैभववाडी वगळता इतर बहुतांश तालुक्यांत पावसाचा जोर कमी राहिला. मालवण तालुक्यात 25 मिमी पाऊस झाला, तर देवगडमध्ये दिवसभरात पावसाची नोंद झाली नाही.

शेअर करा