सिंधुदुर्ग : आ.निलेश राणेंचे पोलीस संरक्षण कमी केल्यानेच कुरघोडी- वैभव नाईक

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.२६ मे

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैद्य धद्यांचा सुळसुळाट गेले दोन वर्ष सुरू आहे. परंतु कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची अनावश्यक असलेली सुरक्षा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढून घेतलेली आहे. म्हणून आ. निलेश राणे पोलीस अधीक्षकांवर कुरघोडी करत असल्याचा आरोप माजी आ. वैभव नाईक यांनी केला.
पेट्रोल, डिझेलसाठी लोक रांगामध्ये आहेत. शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही आहे. एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगत आहेत की, ताफा कमी करा आणि यांच्या पाठीमागे तीन तीन पोलिसांच्या गाड्या होत्या . त्या जर पोलीस अधीक्षकाने कमी केल्या असतील तर त्याचा राग ठेवून आताच निलेश राणे यांना अवैध धंदे आठवले का? तुम्हाला संरक्षण कशासाठी पाहिजे होतं एवढंच माझं म्हणणं आहे. त्यामुळे तुमचं संरक्षण नाकारला म्हणून तुम्ही पोलीसांवर आरोप करत आहात. इतके दिवस तुम्ही झोपला होता का? हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे तुम्हाला गरज नसलेल्या संरक्षण पोलिसांनी दिलं हे चुकीचं होतं आणि आता संरक्षण काढून घेतल्यानंतर तुम्हाला हा साक्षात्कार झाला आहे का? लोकांना आणि शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळत नाही, यावर तुम्ही लक्ष दिला पाहिजे. जर डिझेल वाचवण्यासाठी पोलिसांनी संरक्षण काढलं असेल तर योग्यच आहे, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

शेअर करा