तळेरे : पखवाज गट्ठा व तुळशीच्या पानावर विठ्ठलाचे लोभस दर्शन

शेअर करा

युवा चित्रकार सार्थक गुरव याची आषाढी वारी निमित्त भक्तीमय कलाकृती

तळेरे,दि.२५ जुलै

आषाढी एकादशी निमित्त कणकवली तालुक्यातील युवा चित्रकार सार्थक गणेश गुरव याने कॅनव्हासऐवजी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या पखवाजाच्या लाकडी गट्ट्यांवर तसेच पांडुरंगाला आवडणा-या मांगल्याचे प्रतिक मानले जाणा- या  तुळशीच्या पानावर भगवान श्री विठ्ठल म्हणजे पांडुरंगाचे आकर्षक चित्रे साकारून भक्ती, संस्कृती आणि कलेचा अनोखा संगम घडविला आहे. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीचे वारकरी, कला रसिक आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.


वारकरी संप्रदायात पखवाज हा केवळ एक वाद्य नसून भक्ती, नामस्मरण आणि अध्यात्माचे पवित्र प्रतीक मानली जाते. अभंगाला साथ मिळते ती या पखवाजाची  'राम कृष्ण हरी'चा अखंड गजर करणाऱ्या वारकऱ्यांच्या भावविश्वाला आकार देण्याचा प्रयत्न या कलाकृतीतून करण्यात आला आहे. विठ्ठलभक्त्तीचे प्रतीक असलेल्या पखवाजाच्या लाकडी गट्ट्यांवर  यांचे चित्र रेखाटून आषाढी संदेश एकादशीचा भक्तिमय समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सार्थक गुरव याने केला आहे.


 ही कलाकृती acrylic रंगांच्या माध्यमातून साकारण्यात आली असून भगवान श्री विठ्ठलाच्या चित्राची उंची ३.५ इंच तर रुंदी १ इंच  आहे.याशिवाय तुळशीच्या पानावरील विठ्ठलाची कलाकृतीची उंची २cm तर रुंदी १.५cm आहे.

आज आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि भक्तीचा संदेश जपण्याचा प्रयत्न सार्थक गुरव याने केला आहे.

शेअर करा