तळेरे,दि.०२ जुलै
मुंबई विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या तृतीय वर्ष पदवी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने यंदाही उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाच्या बीए (एमएमसी), बीबीआय,बीएमएस आणि बी.कॉम या चार विभागांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तसेच बीएएफ विभागाचा निकाल ९६.८८ टक्के, तर बीएस्सी (आयटी) विभागाचा निकाल ९६.६७ टक्के लागला आहे.
यंदाच्या निकालात बीएएमएमसी विभागातील कु. पांगम जुईली महादेव हिने ९.७३ सीजीपीआय मिळवत महाविद्यालयात सर्वाधिक गुण संपादन करून प्रथम येण्याचा मान मिळविला.
विभागनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये बीए(एमएमसी) विभागातून कु. पांगम जुईली महादेव (सीजीपीआय ९.७३) ,बीबीआय विभागातून कु. मनस्वी मनोहर मण्यार (सीजीपीआय ९.७०), बीएएफ विभागातून कु. तळेकर दीक्षा मनोज (सीजीपीआय ९.६८) बीएस्सी (आयटी) विभागातून नारकर श्रुती दीपक (सीजीपीआय ९.५२) बीएमएस विभागातून सावंत सोहम संजय – (सीजीपीआय ९.२८),बी.कॉम विभागातून तसेच कु. ओवेज रिझवान काझी (सीजीपीआय ८.७९), यांनी आपल्या विभागात प्रथम क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे माजी मानद मार्गनिर्देशक मा. विनायक दळवी, सिंधुदुर्ग उपपरिसर प्र. संचालक व दळवी महाविद्यालयाचे समन्वयक मा. श्रीपाद वेलींग, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत सातत्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपत महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटविली आहे.