तळेरे,दि.०२ सप्टेंबर
ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सहज व एकाच छताखाली मिळावा यासाठी वानिवडे, सरवणकर वाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शासनमान्य कार्ड शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सिंधुसेवा प्रबोधिनी (रजि.) आणि भाजपा किसान – सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच सौ. स्वागता व श्री. रमेश सरवणकर यांच्या विशेष आयोजनातून रविवारी, ३० सप्टेंबर रोजी या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात परिसरातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांची मोठी(१२३ जण) गर्दी पाहायला मिळाली. या उपक्रमासाठी सिंधु ग्राम विकास फाऊंडेशन (रजि.) यांचे विशेष सहकार्य लाभले.
या शिबिरामध्ये एकाच ठिकाणी विविध शासकीय कार्ड्स आणि रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने:
आरोग्य व सामाजिक सुरक्षा आयुष्यमान भारत वय वंदना कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आभा (ABHA) कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि ई-श्रम कार्ड.
शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा शेतकरी ID कार्ड, पीएम किसान रजिस्ट्रेशन, पंतप्रधान किसान e-KYC आणि NCMC कार्ड.
या शिबिरास भाजपा किसान मोर्चाचे डॉ. गणेश उर्फ भाई बांदकर, माजी भाजप पडेल मंडळ सचिव व सिंधुसेवा प्रबोधिनी अध्यक्ष श्री. रमेश सरवणकर, वानिवडे सरपंच सौ मेघा सर वणकर,श्री. विलास सरवणकर, श्री. मनोहर सावंत, श्री. अनंत सरवणकर, श्री. पिलाजी सरवणकर व सौ. स्वागता सरवणकर यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ व पैशांची बचत होते, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली. वानिवडे व परिसरातील सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत आयोजकांचे आभार मानले.