तळेरे,दि.२६ जुलै
पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम नंबर १ मध्ये रानभाज्यांची पाककृती व प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. शाळेतील विध्यार्थी व पालकांनी तसेच ग्रामस्थानी या प्रदर्शनात मोठया उत्साहात आपला सहभाग दर्शवला.
शाळेतील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम म्हणजे कोकणातील निसर्गाच्या देणगीतून लाभलेल्या चवदार व सकस भाज्यांचा व त्यापासून बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद ग्रामस्थ व विध्यार्थ्यानी घेतला. गावातील महिलांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती कार्यक्रमात दर्शवली. ओझरम भागशाळा, ओझरम मापारवाडी शाळा येथील शिक्षक वर्ग, मूले व पालक यांचाही सहभाग व उपस्थिती या कार्यक्रमात होती.
विठ्ठल रखुमाई मंदिर समिती (रजि) ओझरम, तीर्थवाडी या संस्थेतर्फे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात पाककृती व प्रदर्शनात भाग घेणाऱ्या सर्व महिलांसाठी रु. २०००/- चे बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक विनायक जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्धल सर्व उपस्थितांचे आभार मानले.