१३ प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड !
तळेरे,दि.२७ जुलै
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे अन्तर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित शालेय जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे प्रशालेतील २७ खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे . मुलींच्या विभागून ७ गटाचे तर मुलांच्या विभागून ६ गटाचे एकुण १३ गटाचे अजिंक्यपद पटकावले आहे.तसेच दोन्ही गटांची जिल्ह्याची जनरल चॅम्पियनशिप कासार्डेतील खेळाडूंनी मिळवली आहे.याशिवाय ११ खेळाडूंनी द्वितीय क्रमांक तर ३ खेळाडूंनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.या यशस्वी खेळाडूमधून प्रथम क्रमांक प्राप्त १३ खेळाडूंची कोल्हापूर विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत प्रशालेतील यशस्वी झालेले ज्यूदोपट्टू पुढीलप्रमाणे –
14 वर्षाखालील मुलीच्या गटात-
23 किलो वजन गटात1) स्वरा देसाई -द्वितीय
2)अनामिका कदम-तृतीय, 32 किलो वजन गटात1)प्रीती शिरसागर-प्रथम2)स्वरा झोरे -द्वितीय, 36 किलो वजन गटात
1)भूमी पंडित -प्रथम,2)भार्गवी केतकर-द्वितीय
17 वर्षाखालील मुलींच्या गटात
40 किलो वजन गटात1) धैर्या परब -प्रथम,
70किलो वजन गटात 2)अस्मि ठुकरुल-प्रथम,
19 वर्षाखालील मुलींच्या गटात -40 किलो वजन गटामध्ये
1)साक्षी विनायक सरवणकर -प्रथम,
44 किलो वजनी गटात-
1)समीक्षा प्रदीप येंडे-द्वितीय, 2)वैदही मधुसूदन राणे -तृतीय,
57 किलो वजनी गटात
1)साक्षी संतोष तेली -प्रथम, 70 किलो वजनी गटात 1)नंदिता प्रवीण मतलवार-प्रथम
14 वर्षाखालील मुलांच्या गटात –
-35कि.ग्रॅ.मध्ये -निरज रमेश पवार- प्रथम,
55कि.ग्रॅ.मध्ये -वरद प्रदिप म्हसकर -द्वितीय,
+50कि.ग्रॅ. वरील वजनगटामध्ये
१) भावेश शिवानंद नारकर -प्रथम,
२)अद्वैत हनुमंत गिते- तृतीय,
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात
45कि.ग्रॅ.मध्ये ओम मंगेश राणे -द्वितीय,
–55कि.ग्रॅ.मध्ये -१)मकरंद रेखाजी कोकरे -प्रथम ,
२)सोहम सत्यवान पाटील – द्वितीय ,
-73कि.ग्रॅ.मध्ये -सोहम दिगंबर लिंगायत -द्वितीय,
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात –
-40कि.ग्रॅ.मध्ये -ध्रुव अभिजीत शेट्ये -द्वितीय,
45कि.ग्रॅ.मध्ये -आदर्श दिपक जाधव -प्रथम,
-45कि.ग्रॅ.वजनगटा मध्ये -अमोल दिपक जाधव -द्वितीय,
–55कि.ग्रॅ.वजनगटा मध्ये- शुभम सूरेश राठोड -द्वितीय,
-73कि.ग्रॅ.मध्ये -किशोर बाबूलाल देवासी -प्रथम,
+90वरील कि.ग्रॅ.वजनगटा मध्ये- विघ्नेश संतोष पेडणेकर -प्रथम आला आहे.
या यशस्वी ज्यूदोपट्टू खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाशिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड,प्रशिक्षक अभिजीत शेट्ये, मार्गदर्शक शिक्षक प्रा.देवेंद्र देवरुखकर,प्रा.श्रीम.प्रियका सुतार यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
या यशस्वी खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या प्राचार्या सौ.बी.बी.बिसुरे
,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.