तळेरे : नाधवडे येथील सचिन मेस्त्री यांनी सूक्ष्म तिळावर साकारलेली विठू रायाचे लोभस रूप

शेअर करा

तळेरे,दि.२५ जुलै

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील सचिन मेस्त्री या अवलिया कलाकाराने आषाढी एकादशी निमित्ताने सूक्ष्म पांढऱ्या तिळावर चक्क विठुराया साकारले आहेत. यातून त्यांनी आपल्यातील कलेला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

सचिन मेस्त्री हे उत्तम मूर्तिकार आणि सुंदर चित्रकार आहेत. तर आपल्याकडील कलेच्या माध्यमातून ते अनेकदा आपली संस्कृती आणि परंपरा ह्या पुढे जाव्यात यासाठी प्रयत्नशील असतात. कलेच्या माध्यमातून ते प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात.

यावेळी अतिसूक्ष्म अशा सफेद तिळावर विठुराया साकारून आपल्या कलेतून वेगळ्याप्रकारे आराधना केली आहे. यासाठी त्यांनी ऍक्रेलिक ब्लॅक कलरचा वापर केला असून त्यासाठी त्यांना अडीज तास लागले.

शेअर करा