तळेरे : कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

शेअर करा

तालुका नियोजन सभेत राष्ट्रीय खेळाडूंचाही सत्कार

तळेरे,दि.२६ जुलै

क्रीडा व युवक सेवा संचनालय
महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुका शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभा नुकतीच कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांच्या दालनात नायब तहसीलदार मुकुंद मंडले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर गवस यांचे प्रतिनिधी विषयतज्ञ सचिन तांबे, कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड,माजी समन्वयक तथा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष बयाजी बुराण, तालुक्यातील जेष्ठ क्रीडा शिक्षक संजय सावळ,टि.जी.पावसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी केले.

खेळाडूंना त्यांच्या हक्काचे क्रीडा संकुल मिळावे- बयाजी बुराण

सभेचे प्रास्ताविक करताना माजी समन्वयक तथा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष बयाजी बुराण यांनी तालुक्यातील खेळाडूंसाठी त्यांच्या हक्काचे क्रीडा संकुल नसल्याने खूप मोठं नुकसान होत आहे असे सांगून प्रशासनाने कणकवली तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची विनंती केली.

राष्ट्रीय खेळाडूं,पालक,कोच व क्रीडा शिक्षकांचा नायब तहसीलदार यांच्या हस्ते सन्मान

१)कु.तन्वी पारकर , कणकवली कॉलेज ( ज्यूदो राष्ट्रीय खेळाडू)
२) कु.दुर्वा पवार -पोदार इंटरनॅशनल स्कूल ( तायक्वांडो राष्ट्रीय खेळाडू)
३)कु.अक्सा शिरगावकर – इंटरनॅशनल स्कूल (धनुर्विद्या राष्ट्रीय खेळाडू)
४) कु.प्रज्योती जाधव -कनेडी ज्यू.कॉलेज (तायक्वांडो राष्ट्रीय खेळाडू)
५)कु.ओवी बाईत व उन्मय शिरवलकर – दोघेही बी एन विजयकर इंटरनॅशनल स्कूल हुंबरठ ( दोघेही राष्ट्रीय तायक्वांडो खेळाडू)
आदी खेळाडूंनी कणकवली तालुक्याचे नावलौकिक शालेय स्पर्धेतून राष्ट्रीयस्तरावर उंचावल्या बद्द्ल गुणवंत खेळाडूं ,तसेच त्यांचे पालक,कोच व क्रीडा शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन नायब तहसीलदार मुकुंद मंडले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
त्यानंतर कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी मनोगत व्यक्त करताना कणकवली तालुक्यातील क्रीडा शिक्षक,पंच व खेळाडू व विविध शाळांनी गतवर्षी उत्कृष्ट सहकार्य केल्यामुळे तालुकास्तरीय १० स्पर्धा निर्विवाद पार पडल्याबद्दल धन्यवाद देत यावर्षी असेच सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करून ,तालुक्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान या सभेला मान्यवरांच्या उपस्थितीत तालुका स्तरावरील १० खेळांच्या तारखा व त्यांचे ठिकाण सर्वानुमते निश्चित करून कणकवली तालुका क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.


कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक


१) कुस्ती- ६ ऑगस्ट -फोंडाघाट ज्यूदो क्लब
२) तायक्वांडो-८ऑगस्ट -कणकवली
३) बुध्दिबळ- ११ऑगस्ट-ल.गो.सामंत विद्यालय हरकुळ बु|
४) कबड्डी -१,२व३ सप्टेंबर – नाथ पै.ज्ञान प्रबोधिनी करुळ
५)खो-खो-८ व ९ सप्टेंबर – तळेरे हायस्कूल
६) शालेय फुटबॉल-११ सप्टेंबर – सेंट उर्सूला वरवडे
७) व्हॉलीबॉल – २९ व ३० सप्टेंबर – कळसुली हायस्कूल
८) कॅरम- माध्य,- ६ व ७ आक्टोंबर माध्य-विद्यामंदिर कनेडी
९) क्रिकेट – १३ व १४ आक्टोंबर- शिवमुद्रा क्रीडा अकादमी ओझरम फाटा
१०) मैदानी स्पर्धा -१५,१६ व १७ आक्टोंबर – कासार्डे हायस्कूल

स्पर्धा आणि क्रीडा शिक्षकांच्या समस्यावर चर्चा…

सभेचे अध्यक्ष नायब तहसीलदार मुकुंद मंडले यांनी स्पर्धेला शुभेच्छा देत शिक्षक व खेळाडू यांच्या अडचणी,समस्या जाणून घेतल्या व याबाबत सकारात्मक विचार करून शासनस्तरावर योग्य ती उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले.
दरम्यान कणकवली तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला तसेच खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांना कणकवलीचे तहसीलदार तथा या क्रीडा परिषदचे अध्यक्ष दिक्षांत देशपांडे व गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
या सभेला तालुक्यातील बहुसंख्य क्रीडा शिक्षक,विविध एकविध संघटनेचे पदाधिकारी, कोच व राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.
या सभेचे बहारदार सुत्रसंचलन विषयतज्ञ सचिन तांबे यांनी करून सभेची रंगत वाढवली . तर शेवटी  दत्तात्रय मारकड यांनी आभार मानून सभेची सांगता केली.

शेअर करा