तळेरे, ,दि.२५ जुलै
पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.1 या शाळेत बांधावरची शाळा हा उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्ताने शालेय मुलांना शेतीची माहिती आणि महत्व प्रात्यक्षिकाद्वारे समजले.
तळेरे येथील शेतकरी उदय पाटील यांच्या शेतामध्ये बांधावरची शाळा उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष रोपांची लागवड केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, निसर्गाचे जतन आणि श्रमांचे मूल्य यांच्ये जिवंत शिक्षण मिळाले. शेतीशी जोडून घेताना निसर्गाचे रक्षण करणे हाही उद्देश त्यामधून या मुलांनी अनुभवला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा देवकी तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, माजी सरपंच शशांक तळेकर, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष निलेश सोरप, माजी सभापती दिलीप तळेकर, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर आणि सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.