तळेरे,दि. १९ ऑगस्ट
तळेरे गावातील ज्येष्ठ नागरिक आणि जुन्या पिढीतील वयोवृद्ध जाणकार व्यक्तीमत्व श्रीमती प्रेमलता वसंत तळेकर ( वय- ९५ वर्षे ) यांचे आज बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
तळेरे गावचे माजी सरपंच शशांक तळेकर तसेच सुधीर, शेखर आणि संदिप उर्फ छोटू यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जुन्या पिढीतील वयोवृद्ध जाणकार व्यक्ती म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच तळेरे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.