तळेरे : श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समिती (रजि.) ओझरम -तीर्थवाडी यांचा स्तुत्य उपक्रम.

शेअर करा

कष्टकरी मजुरांना आणि विद्यार्थ्याना रेनकोट वाटप

तळेरे,दि.२६ जुलै

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समिती (रजि.) ओझरम -तीर्थवाडी समितीच्या माध्यमातून अनेक धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि स्वास्थ्य तसेच वैद्यकीय सेवा उपक्रम नियमित राबविण्यात येतात. गेली दोन वर्षे रक्तदान शिबिरे घेण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढीच्या मार्फत ही शिबिरे राबविण्यात आली त्यात ३५ बाटल्या रक्त रक्तपेढी मध्ये जमा करण्यात आले त्यात तीन दुर्मिळ रक्तगट असलेले रक्तदाते सापडले.
१५ मे २०२६ रोजी रोजी मोफत डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. जनरल चेकअप, इसीजी रिपोर्ट या उपक्रमाचा लाभ सुमारे शंभर ग्रामस्थांनी घेतला.
कासार्डे आणि तळेरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुढील वाटा या उपक्रमातून मुंबईमधून शिक्षण तज्ञ श्रीमती वंदना नागरगोजे यांनी मार्गदर्शन केले.
दिनांक २४ जुलै २०२६ रोजी ओझरम शाळा क्रमांक १ येथे समितीचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या
कार्यक्रमास सुमारे १२५ जण उपस्थित होते त्यामध्ये ग्रामीण भागात उदरनिर्वाहासाठी मजुरी करणारे मजूर मोठ्या प्रमाणात सहभागी होते तसेच ओझरम शाळा नं.१, भाग शाळा व मापारवाडी शाळा येथील विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते. यावेळी या सर्वांना रेनकोट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विनायक जाधव यांनी केले. प्रास्ताविक या शाळेचे माजी विध्यार्थी बाबू वासुदेव राणे यांनी केले. जितेंद्र राणे यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी सरपंच सौ. समृद्धी राणे, सौ.विभावरी राणे-देसाई, सौ.वृषाली राणे यांची समयोचित भाषणे झाली. व्यासपीठावर एल. डी. राणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश राणे, शशिकांत देसाई, तंटामुक्ती मुक्ती अध्यक्ष सदाशिव राणे, निवासी संकुल अधीक्षक दिनेश राणे, रामचंद्र बिर्जे, सौ. दिव्या राणे, सौ. अपर्णा राणे, समाजसेवक वसंत राणे हे मान्यवर उपस्थित होते. प्रशाळेच्या शिक्षिका सौ. शालिनी तांबे यांनी आभार मानले.

शेअर करा