संशयित आरोपी संजय कणिराम राठोड यांना वैभववाडी पोलिसांकडून अटक; कणकवली न्यायालयाचा आदेश.
वैभववाडी ,दि.१६ जुलै
पोलिसांनी बुधवारी रात्री अटक करून गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भुईबावडा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षे दरम्यान झालेल्या कॉपी प्रकरणी राठोड व हेत हायस्कूलचे शिक्षक संजय कुमार आडे व एका अज्ञात व्यक्ती विरोधात वैभववाडी पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दहावी परीक्षे दरम्यान आपल्या मुलाला जास्त गुण मिळावे या हव्यासापोटी मुख्याध्यापक असलेले राठोड आणि रीलीवर पर्यवेक्षक श्री आडे हे परीक्षार्थी च्या वर्गा बाहेरून अज्ञात व्यक्तीच्या हस्ताक्षरातील उत्तरे लिहिलेल्या पुरवण्या वर्गातील पर्यवेक्षकांकडे देऊन त्या उत्तर पत्रिकेस जोडण्यात सांगत असत असा आरोप विभागीय मंडळाच्या चौकशीत ठेवण्यात आला होता. वैभववाडी गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दिनांक 22 जून रोजी फिर्याद दिली होती. त्यानंतर गेले २३-२४ दिवस वैभववाडी पोलीस श्री आडे व श्री राठोड यांच्या मागावर होते. हे दोन्ही शिक्षक नॉट रिचेबल होते. ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते दरम्यान संजय राठोड यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता मात्र गुन्ह्याची गंभीरता व व्याप्ती विचारात घेतात जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी त्याचा जामीन अर्ज फेटाळला. अर्ज फेटाळल्यानंतर बुधवारी संजय राठोड हा स्वतःहून वैभववाडी पोलीस ठाण्यात हजर झाला. वैभववाडी पोलिसांनी त्याला गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर केले. वैभववाडी पोलिसांनी या गुन्ह्यासाठी आरोपीला पोलीस कोठाडी मिळणे आवश्यक असल्याचे न्यायालयच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे न्यायालायाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठाडी सुनावली आहे.
तर या प्रकरणातील दुसरा आरोपी संजयकुमार आडे यानेही अटकपूर्व जमीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तो त्याने मागे घेतल्याचे समजते. आता राठोड प्रमाणे तोही स्वतः पोलीस ठाणेत हजर होतो. की पोलिसांना त्याला शोधून काढावे लागणार हे पहावे लागणार आहे. तर तिसरा आरोपी हा अज्ञात असून या दोघांच्या चौकशीत तो उत्तर पत्रिका लिहिणारा तिसरा आरोपी कोण हे उघड होणार आहे.
मुख्य आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा हात आहे. या गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होईल अशी शक्यता आहे. आणखी काही जणांवर गुन्हे नोंद होण्याची शक्यता व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव करीत आहेत..