वैभववाडी : अरुळे येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्टीटल व ए . एस .पी . एम मेडीकल कॉलेज सांगुळवाडी यांचे आरोग्य शिबिर संपन्न

शेअर करा

वैभववाडी ,दि.१४ ऑगस्ट

आज दि. १४/८/२०२६ रोजी ग्रामपंचायत अरुळे येथे श्री . राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व ए .एस . पी . एम मेडीकल कॉलेज सांगुळवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सडुरे यांचे मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले . शिबिरात विवीध आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या यावेळी अरुळे ग्रामपंचायत सरपंच सौ मानसी रावराणे उपसरंच रमेश वारंग गावचे पोलिस पाटील सुर्यकांत बोडके ग्रामसेवक प्रशांत जाधव उपस्थित होते तसेच श्री राजन पाटील आयुर्वेदीक हॉस्पीटलचे डॉक्टर अनिरुद्ध मुद्राळे तसेच सडूरे उपकेंद्रचे समुदाय आरोग्य अधिकारी सुमित दराडे व आरोग्य अधिकारी डॉ. महिंद्रकर उपस्थित होते
तसेच विषमुक्त शेती व योग तज्ञ जानवी भावे उपस्थित होत्या त्यांनी गावातील ग्रामस्थांना योग विषयी मर्गदर्शन केले व प्रात्यक्षिक योग प्रशिक्षण पण दिले .

शेअर करा