वेंगुर्ला: बुद्धिबळ स्पर्धेत अन्वय सापळे प्रथम

शेअर करा

वेंगुर्ला,दि.३० सप्टेंब

राजापूर येथे रॉयल चेस अकॅडमीच्यावतीने २७ सप्टेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलचा इयत्ता ४थी मधील विद्यार्थी कु. अन्वय जगदीश सापळे याने ९ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा