वेंगुर्ले : सुंदररीत्या साकारलेले नमो उद्यान स्पर्धेत नक्कीच प्रथम क्रमांक मिळवेल : पालकमंत्री नितेश राणे

शेअर करा

वेंगुर्ले येथे न.प. ने उभारलेल्या ‘नमो उद्याना’चे शानदार लोकार्पण….

वेंगुर्ले,दि.०५ सप्टेंबर

वेंगुर्ला नगरपरिषदेचे नियोजनबद्ध काम लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चालू आहे. नगराध्यक्ष दिलीप गिरप व त्यांची टीम आणि प्रशासन या सर्वांचे कौतुक करतो. सुंदर असे नमो उद्यान शासनाने दिलेल्या मुदतीत सुंदररीत्या साकारले आहे. त्यामुळे स्पर्धेत हे उद्यान नक्कीच प्रथम क्रमांक मिळेल यात शंका नाही. पण आता वेंगुर्लेने एवढ्यावर मर्यादित न राहता शिरोडा येथे होणाऱ्या पंचतारांकित ताज प्रकल्पाच्या अनुषंगाने पर्यटनावर आधारित प्रकल्प उभारावेत यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील असे अभिवचन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे बोलताना दिले.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वतीने भटवाडी येथे एक कोटी रुपये खर्च करून साकारण्यात आलेल्या ‘नमो उद्याना’चा लोकार्पण सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. नितेश राणे बोलत होते.
वेंगुर्ला शहराच्या सौंदर्यात भर घालणारे तसेच नागरिकांना विरंगुळा, आरोग्य व मनोरंजनासाठी उपयुक्त असे हे नमो उद्यान विकसित करण्यात आले आहे. या उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याला आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिस, नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर,भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर न.प. सभापती प्रणव वायंगणकर, सचिन शेट्ये, गौरी मराठे, गौरी माईणकर, युवराज जाधव तसेच नगरसेवक सुषमा प्रभूखानोलकर, शितल आंगचेकर, रवी शिरसाट, सदानंद गिरप, विनय नेरुरकर, संदेश निकम, सुधीर पालयेकर, प्रीतम सावंत, प्रशांत आपटे, अंकिता परब, रिया केरकर, सुमन निकम, समिधा रेडकर, काजल कुबल, लीना म्हापणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की, नमो उद्यान हा केंद्र सरकारचा प्रकल्प प्रकल्प तुम्ही निश्चित पद्धतीने पूर्ण केला. यामध्ये अजून जे काही लागेल त्यालाही आमचे पाठबळ राहील. पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्यात अजून दहा-पंधरा पर्यटन स्थळ विकसित करून या भागात येणारा पर्यटक येथेच कसा थांबेल या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. नवीन नवीन संकल्पना कशा राबवता येतील त्याकडे नगरपालिकेने पाहावे असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
सिंधू रत्नाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी आहे. त्यामुळे राज्यांमध्ये काय चाललंय त्याचा अभ्यास करा त्याची माहिती मिळवा आणि आमच्याकडे नाविन्यपूर्ण काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करा.
उद्यानातील बोट प्रकल्पासाठी वीस लाख रुपये देणार : आम.दीपक केसरकर
वेंगुर्ले येथील नमो उद्यान सुंदर साकारले आहे. अशाच प्रकारे वेंगुर्ले नगर परिषदेने विकास कामे करत राहावी आमचे नेहमी सहकार्य राहील. उद्यानातील बोट प्रकल्पासाठी आपल्या आमदार निधीतून वीस लाख रुपये देणार असे यावेळी आम.दीपक केसरकर यांनी जाहीर केले.
तर नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी प्रास्ताविक करताना केंद्र शासनाने व पालकमंत्री नितेश राणे यांनी दाखवलेल्या विश्वासानुसार आम्ही वेळेत सुंदर असे हे नमो उद्यान उभारले आहे. याचे अजून काम बाकी आहे. त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी पालकमंत्री नितेश राणे यांनी आमदार दीपक केसरकर यांनी द्यावा अशी मागणी केली. तसेच निवडणुकीत दिलेल्या वचनाप्रमाणे शहरातील विकसित केलेल्या पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन आज होत असल्याने समाधान आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी अजित पवार राष्ट्रवादी चे प्रदेश सदस्य एम के गावडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, उमेश येरम, दत्ता साळगावकर, अभी वेंगुर्लेकर, उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी ठेकेदार एस एल ठाकूर व अभियंता यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नगरसेवक प्रशांत आपटे यांनी मानले.

सुंदररीत्या साकारलेले नमो उद्यान स्पर्धेत नक्कीच प्रथम क्रमांक मिळवेल : पालकमंत्री नितेश राणे

वेंगुर्ले येथे न.प. ने उभारलेल्या ‘नमो उद्याना’चे शानदार लोकार्पण….

वेंगुर्ले : प्रतिनिधी