वेंगुर्ला,दि.२६ जुलै
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीनही तालुक्यांतील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमांना भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी आवर्जून उपस्थिती लावली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्तांसोबत विठूनामाचा गजर करत भक्तिभावाने पूजा-अर्चा केली. पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत संपूर्ण कोकणवासीयांच्या सुख, शांती, समृद्धी आणि निरामय जीवनासाठी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली.
वेंगुर्ला येथील चांदेरकर विठ्ठल मंदिरात युवा नेते विशाल परब यांनी भेट देत ह.भ.प.सावळारामबुवा कुर्ले यांच्यासहीत अन्य वारकऱ्यांचाही सन्मान केला. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेटये, रवी शिरसाट, भाजप जिल्हा उपाध्यक्ष साईप्रसाद नाईक, मच्छीमार नेते दादा केळुसकर, किरण कुबल, विजय रेडकर, विजय बागकर, सुनिल मठकर, राजू गिरप, रसिका मठकर, किशोर रेवणकर तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी व भाविक उपस्थित होते.