वेंगुर्ला : वाचन संस्कृती रूजवा; स्पर्धा परिक्षांमध्ये सहभाग घ्या!-उल्हास तळवडेकर

शेअर करा

वेंगुर्ला ,दि.२८ जुलै

स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर चांगले संस्कार, जिद्द,
चिकाटी, मेहनत, सचोेटी आवश्यक आहे. तसेच वाचन संस्कृती रूजवा आणि स्पर्धा परिक्षांमध्ये सहभाग घेऊन स्वत:सोबतच समाजाचा नावलौकीक करून जीवनात यशस्वी व्हा असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक उल्हास तळवडेकर यांनी वेंगुर्ला येथे केले.


सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ वेंगुर्ला शाखेतर्फे २६ जुलै रोजी वेंगुर्ला-भटवाडी येथील वैभव तुळसकर यांच्या निवासस्थानी तेली समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपिठावर जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष तुकाराम तेली, सचिव दशरथ कवठकर, परशुराम झगडे, ज्येष्ठ नागरिक उल्हास तळवडेकर, उद्योजक कुणाल वरसकर, तालुका अध्यक्ष सुनिल नांदोसकर, विद्याधर वरसकर, अॅड.मनिष सातार्डेकर, अशोक पेडणेकर, आना सातार्डेकर, नम्रता वरसकर, प्रविण सातार्डेकर, वैभव तुळसकर, वैभवी तुळसकर, सीमा तुळसकर, बिपीन वरसकर, संतोष खानोलकर, नियान तेली आदी उपस्थित होते.


नोकरीच्या मागे न धावता गाव ते एक उद्योग उभारून स्वत:चा उत्कर्ष साधा असे आवाहन कुणाल वरसकर यांनी केले. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यशाबरोबर अपयश पचवले पाहिजे, असे अॅड. मनिष सातार्डेकर यांनी स्पष्ट केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तेली समाजातील दहावी, बारावी व स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला सानिका वरसकर, नवनाथ सातार्डेकर, सुधिर डिचोलकर, शिला नांदोसकर, ऐश्वर्या वरसकर, अक्षय पेडणेकर, प्रशांत वेंगुर्लेकर, योजना वरसकर, दिपेश वरसकर, अमृता वरसकर, शुभांगी तेली, गौरव वरसकर यांसह समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सीमा तुळसकर यांनी मानले.

शेअर करा