वेंगुर्ला,दि.३० सप्टेंबर
क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षाखालील गटातून सन्मिल साटेलकर तर १७ वर्षाखालील गटातून रुद्र मोबारकर यांनी चमकदार कामगिरी करत यश संपादन केले. त्यांची विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, पेट्रॅान कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी देसाई-मोरे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन करून विभागस्तरीय होणाऱ्या बुद्धीबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.