वेंगुर्ला : नगर वाचनालयाला दात्यांकडून देणगी

शेअर करा

वेंगुर्ला ,दि.१५ जुलै

नगर वाचनालय, वेंगुल्र्याच्या सुविधा वाढविण्यासाठी सात दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत, प्रत्येकी सुमारे 12 हजार रूपये किंमतीचे एक याप्रमाणे 8 स्टीलची कपाटे देणगी स्वरूपात दिली आहे.
यामध्ये वेंगुर्ला नगर वाचनालय संस्थेचे अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर यांनी आपली आई लीलावती प्रभूखानोलकर यांच्या स्मरणार्थ 1 कपाट, संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर यांनी आपली आई सरस्वती गजानन बांदेकर यांच्या स्मरणार्थ 1 कपाट, संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य राजेश शिरसाट यांनी आपली आई आशालता शिरसाट व वडील गुरूनाथ शिरसाट यांच्या स्मरणार्थ 2 कपाटे, दीपराज बिजीतकर यांची आई शितल बिजीतकर यांनी आपले पती गुरूदत्त बिजीतकर यांच्या स्मरणार्थ 1 कपाट, संस्थेचे वाचक सुनिल नातू यांनी आपली आई सौ.स्नेहलता नातू व वडील बाळकृष्ण नातू यांच्या स्मरणार्थ 1 कपाट, श्रीमती विनया खानोलकर यांनी आपले पती विवेक उर्फ विभा खानोलकर यांच्या स्मरणार्थ 1 कपाट अशी एकूण 8 कपाटे संस्थेस देऊन सहकार्य केले आहे.
या देणगीदारांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी आभार मानले आहेत. देणगी द्यायची असल्यास संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन नगर वाचनालयाने केले आहे.

शेअर करा