वेंगुर्ले,दि.२६ जून
अंगात दैवीशक्ती आहे असे भासऊन जादूटोणा सारखे अघोरी कृत्य करून लोकांकडून पैसे उकळून लोकांना त्रास देऊन अंधश्रद्धा पसरविल्या प्रकरणी उभादांडा येथील चार जणांविरोधात वेंगुर्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मालवण येथील विजय रोहीदास चौकेकर वय ६३ वर्ष यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, उभादांडा येथील कुबल स्वतःच्या अंगात दिव्यशक्ती असल्याचे भासवून जादूटोणा सारखे अघोरी कृत्य करतात. यासाठी लोकांकडून पैसे उकळून समाजात अंधश्रद्धा पसरवतात आणि समाजातील लोकांची फसवणूक करतात. तसेच कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना पोटदुखी कमी होण्यासाठी औषध म्हणून गोमुत्रातून घेण्यासाठी चुर्ण देतात आणि लोकांना फसवतात.
हा प्रकार ११ जून ते १८ जून २०२६ या कालावधीत घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. या तक्रारी वरून पोलिसांनी औषधी द्रव्ये ,तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) अधि.1954 कलम 5 , 7 प्रमाणे, महाराष्ट्र नरबळी आणि, अनीष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम-3(2) प्रमाणे उभादांडा येथील अमृता अनिल कुबल, अनील कुबल, मकरंद कुबल आणि मिताली मकरंद कुबल या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी करत आहेत.