वेंगुर्ला: आदर्श शिक्षक, शिक्षिका आणि शाळा पुरस्कारांचे 2 रोजी वितरण

शेअर करा

वेंगुर्ला,दि.३० सप्टेंबर

नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे आदर्श शिक्षक, शिक्षिका आणि आदर्श शाळा पुरस्कार जाहिर करण्यात आले होते. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर रोजी सायं. 4 वा. संस्थेचे लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात होणार आहे.
या सोहळ्यात संस्थेने जाहीर केलेले कै.मेघ:शाम रा.गाडेकर व कै.जानकीबाई मे.गाडेकर तसेच कै.सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर आणि कै.सौ.गंगाबाई पांडुरंग जोशी स्मृती पुरस्कारांचे वितरण होणार असून यासाठी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे आदी उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

शेअर करा