वेंगुर्ला गोवंशाची बेकायदेशीर कत्तल रोखण्याबाबत पोलिसांना निवेदन

शेअर करा


वेंगुर्ला प्रतिनिधी –

बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी होणारी गोवंशाची बेकायदेशीर कत्तल रोखण्याबाबत वेंगुर्ला येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात, २७ मे रोजी बकरी ईदनिमित्त विविध ठिकाणी कुर्बानी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघंन करून गोवंश (गाय, बैल, वासरे) यांची बेकायदेशीर कत्तल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवेदनशील व संशयीत भागांमध्ये विशेष पोलीस गस्त व दक्षता पथक नेमण्यात यावे, बेकायदेशीररित्या गोवंश वाहतूक किंवा कत्तलीची माहिती मिळाल्यास तात्काळ कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, संशयित पशुधनाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून आवश्यकतेनुसार त्यांना सुरक्षित गोशाळेत ठेवण्याची व्यवस्था करावी, प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा व इतर लागू कायद्यांनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करतेवेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटोओळी – बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी होणाऱ्या गोवशाची बेकायदेशीर कत्तल रोखणेबाबत विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे वेंगुर्ला पोलीस निरीक्षक ओतारी यांना निवेदन देण्यात आले.

शेअर करा