वेंगुर्ला ,दि.२८ जुलै
वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताहाला ३० जुलैपासून प्रारंभ होत असून अष्टोप्रहर भजनांसोबत वारकरी आणि संगीतसह एकूण १३ भजन मंडळांना निमंत्रित केले आहे.
दि. 30 जुलै रोजी सायं.7 वा. स्वरबंदिश भजन मंडळ वेंगुर्ला, रात्रौ 8 वा. ब्राह्मण भजन मंडळ-भेंडमळा, दि.31 रोजी सायं.7 वा. दत्तप्रासादिक भजन मंडळ कुबलवाडा, रात्रौ 8 वा. देऊळवाडा भजन मंडळ-वेंगुर्ला, दि.1 रोजी सायं.7 वा. जनतासेवा भजन मंडळ परबवाडा, रात्रौ 8 वा. राष्ट्रोळी भजन मंडळ-वजराठ, दि.2 रोजी सायं.7 वा. गोठण भजन मंडळ-वजराठ, रात्रौ 8 वा. अचानक भजन मंडळ-वेंगुर्ला, दि.3 रोजी सायं.7वा. ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ-रेडी, रात्रौ 8 वा.ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ-नमसवाडी, दि.4 रोजी सायं. 7 वा. वाटोबा भजन मंडळ-उभादांडा, रात्रौ 8 वा.बागायतवाडी भजन मंडळ-शिरोडा, दि.5 रोजी रात्रौ 7.30 वा. धावडेश्वर भजन मंडळ-कॅम्प या निमंत्रित संगीत व वारकरी मंडळांची भजने सादर होणार आहेत. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.