वेंगुर्ले : वेतोरे येथे शिक्षकाची आत्महत्या : पोलीस ठाण्यात नोंद

शेअर करा

वेंगुर्ले,दि.२७ जुलै
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे हायस्कूल चे शिक्षक पांडुरंग विरप्पा वगरे (वय ५० वर्ष ) रा.पालकरवाडी,वेतोरा मूळ राहणार मंगळवेढा यांनी मध्यरात्री राहत्या घरी लोखंडी अँगल ला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पालकरवाडी वेतोरा येथील शुभम जयवंत गोगटे यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. त्यांच्या घरा शेजारी हे वगरे शिक्षक राहतात. सकाळी त्यांना ही घटना समजताच त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. त्यानुसार वेंगुर्ले पोलीस ठाणे घटनास्थळी धाव घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस सरफादार करीत आहेत.

शेअर करा