बांदा परिसरात गोवा बनावटीच्या दारूसह ११.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा

शेअर करा

बांदा,दि.२८ जून

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बांदा पोलीस ठाणे हद्दीत रविवारी पहाटे केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाख ७३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिश मंदार पांगम (वय २७, रा. जुना बाजार, सावंतवाडी) आणि अजित बाळकृष्ण मठकर (वय ३९, रा. सावंतवाडी) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख ७३ हजार ८४० रुपयांची गोवा बनावटीची दारू तसेच ९ लाख रुपयांची चारचाकी गाडी असा एकूण ११ लाख ७३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई २८ जून २०२६ रोजी सकाळी ६.४५ वाजता बांदा पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (अ), (ई), ८१ व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हनुमंत भोसले, एएसआय सुरेश राठोड आणि पोलीस शिपाई अमर कांडर यांनी ही यशस्वी कारवाई केली. पुढील तपास बांदा पोलीस करत आहेत.

शेअर करा