सायंकाळी भजन व नामस्मरणाचे आयोजन; पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे देवस्थानतर्फे भाविकांना आवाहन!
वेंगुर्ला,दि.०५ नोव्हेंबर (प्रथमेश गुरव)
वेंगुर्ला शहरातील कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात गुरूद्वादशी उत्सव सुरू असून याची सांगता शुक्रवारी गावातून पालखी प्रदक्षिणेने होणार आहे. शुक्रवारी सकाळी श्रींची पाद्यपूजा, सायंकाळी ६.३० वा. नामस्मरण, रात्रौ ७ वा. स्वरबंदीश मंडळाचे भजन त्यानंतर ८.३० वाजता पालखी प्रदक्षिणेला प्रारंभ होणार आहे. ही पालखी कुबलवाडा, रामे·ार मंदिर, माणिकचौक, राम मारूती रोड, मारूती स्टॉप मार्गे पुन्हा मंदिरात येणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.




