बांदा : बांद्यात भाजपतर्फे भगवान श्री वराह जयंती उत्साहात

शेअर करा


बांदा,दि.१४ सप्टेंबर


भारतीय जनता पार्टी बांदा शहराच्यावतीने भगवान श्री वराह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान श्री वराह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवान श्री वराह यांना अभिवादन करून जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला माजी सरपंच बाळा आकेरकर, युवा शहराध्यक्ष विकी कदम, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, माजी शहराध्यक्ष बाबा काणेकर, सोशल मीडिया प्रमुख विराज परब, आशिष कल्याणकर, माजी शहराध्यक्ष केदार कनबर्गी आणि आप्पा कोचरेकर उपस्थित होते.
भगवान श्री वराह जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात धार्मिक परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

शेअर करा