देवगड : तारामुंबरीतील विठ्ठल-रुक्माई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह; उद्योजक नंदकुमार घाटे यांनी घेतले दर्शन

शेअर करा

मानकरींचा शाल-पुष्पगुच्छ देऊन सन्मान; महिला भाविकांचा गुलाबपुष्प देऊन केला गौरव

देवगड,दि.०३ सप्टेंबर

तालुक्यातील तारामुंबरी येथील श्री विठ्ठल-रुक्माई मंदिरात २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, हरिनाम, आरती तसेच अन्य धार्मिक उपक्रम भक्तिमय वातावरणात सुरू आहेत.

या धार्मिक सप्ताहाला उद्योजक नंदकुमार घाटे यांनी भेट देत श्री विठ्ठल-रुक्माईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरातील सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची माहिती घेत भाविकांशी संवाद साधला.

यावेळी विद्यमान मानकरी सूर्यकांत जोशी व शिवाजी कांदळगावकर यांचा नंदकुमार घाटे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित महिला भाविकांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी ज्ञानेश्वर खवळे, बापू जुवाटकर, शरद शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहामुळे तारामुंबरी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा