भाजप शहराध्यक्षांच्या पुढाकारातून समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन; वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा संदेश.
देवगड ,दि.२६ जून
देवगड शहराचे अध्यक्ष श्री.वैभव करंगुटकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री मान.नामदार श्री.नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवला.
जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील गरीब , गरजू आणि होतकरू पाच विद्यार्थिनीना शालेय गणवेश , दप्तर आणि वह्यांचे वाटप करून त्यांनी त्या विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या प्रवासाला एक छोटासा पण मोलाचा आधार दिला. तसेच लांबून एस.टी.ने प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थ्याला वर्षभराच्या तिकिटाची रक्कम अदा करून संबंधित विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास सुखकर केला.
याप्रसंगी माजी आमदार श्री.ॲड अजितराव गोगटे ,जेष्ठ नेते श्री. बाळ खडपे , वैभव करंगुटकर- भाजपा शहराध्यक्ष , श्री.शरद ठुकरुल- नगरसेवक गटनेते , सौ. उषःकला केळुसकर- महिला अध्यक्षा , श्री.संतोष तारी- नगरसेवक सौ.प्रणाली माने- नगरसेविका ,
श्री.ज्ञानेश्वर खवळे- मच्छिमार नेते ,
श्री.मिलिंद माने , श्री.सुभाष धुरी
श्री.व्ही .सी.खडपकर ,मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
नेत्यावर प्रेम करणारे अनेक असतात …. पण त्या नेत्यांचे विचार , त्यांची समाजसेवेची भावना आणि सर्वसामान्यांसाठीची तळमळ समाजापर्यंत पोहोचवणारे कार्यकर्ते मात्र विरळ असतात. नितेशजी राणे यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आहेत , पण त्यांच्या विचारांना कृतीची जोड देऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारे कार्यकर्ते हीच नेतृत्वाची खरी ताकद आहे.
नेत्याच्या वाढदिवसाचा खरा उत्सव बॅनरवर नाही ,तर एखाद्या गरजूच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात असतो हे वैभवजी करंगुटकर यांनी आपल्या अभिनव कृतीतून दाखवून दिले .
त्यांच्या या दात्तृत्वाबद्दल मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी वैभव करंगुटकर यांचे आभार मानले आहेत .