दोडामार्ग, दि. २६ जून
येथून जवळच असलेल्या पिकुळे गावातील तरुण मेघश्याम विलास गवस, वय वर्षे २४ याचा मृतदेह मधलीवाडी येथील शेत विहिरीत सडलेल्या स्थितीत शुक्रवारी आढळून आला. यामुळे खळबळ उडाली आहे. हा युवक विहिरीत पडून मृत्यू झाला याबाबत तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
आशिष उमेश गवस, याने दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद झाली आहे.
शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात दिला.
हा युवक दोडामार्ग मध्ये एका हाॅटेल मध्ये कामाला होता.